Mhada Lottery : शिक्षण, नोकरी आणि त्यानंतर स्वत:चं घर... हे अनेकांचच स्वप्न असतं. या स्वप्नासाठी काही मंडळींची धडपड, प्रयत्न फार आधीपासूनच सुरु होतात आणि मग या प्रयत्नांना एका टप्प्यावर येऊन प्रत्यक्ष स्वरुप प्राप्त होतं. काहींना मात्र हक्काच्या घरासाठीचे प्रयत्न करताना अनेक अडचणींचा सामनाही करावा लागतो. इथं सर्वात मोठी अडचण असते ती म्हणजे पैशांची. बऱ्याचदा घर आवडलंय पण, खिशाला परवडत नाहीय, असं म्हणत आवडीच्या आणि त्यातूनही स्वप्नातल्या घरावर पाणी सोडलं जातं. पण, आता मात्र ही परिस्थिती उदभवणार नाहीय. कारण, म्हाडाची आगामी सोडत स्वप्नांच्या घराच्या उभारणीसाठी अनेकांनाच हातभार लावताना दिसणार आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पूर्ण उत्साहात सुरु होण्याआधी आणि त्यासाठीची आचारसंहिता लागू होण्याआधी म्हाडाच्या घरांची सोडत जारी केली जाणार असून, त्यासाठीची अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया येत्या काळात सुरू केली दाणार आहे. पुढील महिन्याभराच्या काळात सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करून त्यानंतर तातडीनं ऑगस्ट महिन्यापर्यंत अर्ज विक्री आणि स्वीकृतीसाठी म्हाडा प्रयत्नशील असल्याचं म्हटलं जात आहे.
म्हाडाच्या या सोडतीअंतर्गत मुंबई सोडतीमध्ये उपलब्ध असणाऱ्या घरांमधून उरलेल्या घरांसोबतच मालाड, गोरेगाव, दिंडोशी, पवई कोपरी, विक्रोळी कन्नमवार नगर भागामधील घरं उपलब्ध असणार आहेत. 2020 ते 2022 दरम्यान म्हाडानं सोडत काढली नसून, 2023 मध्ये 4082 घरांसाठीची सोडत काढण्यात आली होती. पण, यंदाच्या वर्षी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत ससोडत जाहीर करण्यात येणार असल्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.
ठिकाण | उत्पन्न गट | घरांचं क्षेत्रफळ | घरांच्या किमती |
कन्नमवारनगर विक्रोळी | मध्यम गट | 650 चौरस फूट | 70 ते 72 लाख |
कन्नमवारनगर विक्रोळी | अल्प गट | 473 चौरस फूट | 40 लाख रुपये |
कन्नमवारनगर विक्रोळी | अल्प गट | 585 चौरस फूट | 50 लाख रुपये |
पवई कोपरी | मध्यम गट | 700 ते 800 चौरस फूट | 1 कोटी 25 लाख |
पवई कोपरी | उच्च गट | 980 चौरस फूट | 1 कोटी 60 लाख रुपये |
खडकपाडा | अल्प गट | 44.61 चौ. मीटर | 64 लाख 72 हजार 584 रुपये |
खडकपाडा | अल्प गट | 59.91 चौ. मीटर | 86 लाख 11 हजार 923 रुपये |
गोरेगाव पहाडी | मध्यम गट | 794.31 चौरस फूट | 1 कोटी 7 लाख 5 हजार रुपये |
गोरेगाव पहाडी | उच्च गट | 959 चौरस फूट | 1 कोटी 25 लाख 91 हजार रुपये |
गोरेगाव | पीएमवाय | 322 चौरस फूट | 33 लाख 2000 रुपये |
मालाड शिवधाम | अल्प | 44.20 चौरस मीटर | 54 लाख 91 हजार रुपये |
मालाड शिवधाम | अल्प | 58.93 चौरस मीटर | 73 लाख 22 हजार रुपये |