मुंबई : मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा स्थानकांदरम्यान सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० पर्यंत दुरुस्तीची कामं केली जाणारयत. त्यामुळे या मार्गावरच्या लोकल अप जलद मार्गावरून चालवण्यात येतील.
हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलाय. सकाळी ९.५२ ते दुपारी ४.३९ वाजेपर्यंत सीएसटी ते चुनाभट्टी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरची लोकल सेवा बंद राहणारय.
त्याचबरोबर सीएसटी ते वांद्रे-अंधेरी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरची लोकल सेवा सकाळी १०.३८ ते दुपारी ४.१३ वाजेपर्यंत बंद राहील. प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातील फलाट क्रमांक ८ वरून विशेष पनवेल लोकल धावतील.
तर पश्चिम रेल्वेवर मरिन लाइन्स ते माहीम स्थानकांदरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. परिणामी, अप-डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक अप-डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल.