मराठी राजभाषा हस्ताक्षर स्पर्धा, सहभागी व्हा आणि जिंका बक्षिसे

Marathi Rajbhasha Language Handwriting Competition : तुम्हाला बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला मराठी राजभाषा हस्ताक्षर स्पर्धेत सहभागी व्हावे लागेल.  

Updated: Jan 22, 2022, 11:44 AM IST
मराठी राजभाषा हस्ताक्षर स्पर्धा, सहभागी व्हा आणि जिंका बक्षिसे title=

मुंबई : Marathi Rajbhasha Language Handwriting Competition: तुम्हाला बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला मराठी राजभाषा हस्ताक्षर स्पर्धेत सहभागी व्हावे लागेल. ही स्पर्धा बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने (Mumbai Newspaper Vendors Association) आयोजित केली आहे. 'मराठी राजभाषा हस्ताक्षर स्पर्धा' या नावाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. तिचे संरक्षण व संवर्धन ही आपली जबाबदारीआहे. मराठी भाषेचा एक अनमोल ठेवा आहे. हा ठेवा, वारसा आपल्याला पुढच्या पिढीला सोपवत गेले पाहिजे‌. आपल्या मुलांना मराठी भाषेची ओळख, मराठी साहित्याची जाण करून देण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने दिली. मुलांमध्ये हस्तलेखनाची आवड निर्माण व्हावी आणि स्वच्छ, सुवाच्य हस्तलेखनाचे महत्त्व त्यांना कळावे हे उद्दिष्ट समोर ठेवून  हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले आहे, असे संघाने स्पष्ट केले.

ऑनलाईन अभ्यासात हस्तलेखन कुठेतरी मागे पडत होते. हस्ताक्षर स्पर्धेमध्ये कोणत्याही मराठी वर्तमानपत्रातून वहीचे एक पान भरेल एवढा मजकूर आपल्या हस्ताक्षरात लिहावयाचा आहे. वर्तमानपत्रातील मजकुराचे कात्रण वहीच्या डाव्या पानावर चिटकवायचे आहे आणि आपला मजकूर उजव्या पानावर लिहावयाचा आहे. किमान पंचवीस पान भरलेली वही स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. 

22  जानेवारी  ते 27 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रकाशित होणाऱ्या कोणत्याही मराठी वर्तमानपत्रातील रोज एक पान याप्रमाणे आपण वहीत लिहू शकता. स्पर्धा विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी  व्हाट्सअप संपर्क : 81695 53964 किंवा या लिंक वर भेट द्या https://sparkevent.in/hastakshar-spardha-2022 येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.