गप्पा मारत प्लॅटफॉर्मवर आले, शांतपणे रुळावर झोपले, भाईंदरमध्ये वडील-मुलाचं धक्कादायक पाऊल.. Video

Bhayandar CCTV : भाईंदर रेल्वे स्थानकात वडिल-मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी गर्दीच्यावेळी ही घटना घडल्याने खळबळ उडाली. हादरवणाऱ्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 9, 2024, 08:13 PM IST
गप्पा मारत प्लॅटफॉर्मवर आले, शांतपणे रुळावर झोपले, भाईंदरमध्ये वडील-मुलाचं धक्कादायक पाऊल.. Video title=

Bhayandar CCTV : भाईंदर रेल्वे स्थानकात पिता पुत्राने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी  10.30 च्या सुमारास भाईंदर रेल्वे स्थानकातील (Bhayander Railway Station) प्लेटफॉर्म क्रमांक 6 वर ही घटना घडली आहे. भाईंदर स्थानकात प्लेटफॉर्म क्रमांक 6 वरून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन (Mumbai Local) खाली उडी मारुन दोघांनी आपले जीवन संपवलं. हादरवणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. हरिश मेहता (वय 60 वर्षे) आणि मुलगा जय मेहता (वय 35 वर्षे) अशी यांची नावं आहेत. रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले आणि रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.  या दोघांनी आत्महत्या का केली यांचं कारण समजू शकलेले नाही. वसई रेल्वे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

काय आहे नेमकी घटना?
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हरिश मेहता आणि मुलगा जय मेहता भाईंदरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दहावरुन एकमेकांशी गप्पा मारत चालताना दिसत आहेत. जय मेहताच्या पाठिवर ऑफिसची सॅक दिसतेय. त्यांच्या बाजूने एक ट्रेन जाते. ट्रेन गेल्यानंतर दोघंही रुळावर उतरात आणि रुळावरुन चालू लागतात. त्याचवेळी चर्चगेटच्या दिशेने येत असलेली लोकल अगदी जवळ आल्यावर दोघंही अगदी शांतपणे एकमेकांचा हात पकडून रुळावर जाऊन झोपताना दिसतायत. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. 

आत्महत्येचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक तपासानुसार या दोघांनी नैराश्यात येऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. 

वसई रेल्वे स्थानकात तरुणीचा विनयभंग
दरम्यान वसई रेल्वे स्थानकातून मध्यरात्री कामावरून घरी परतणार्‍या 32 वर्षीय तरुणीचा एकाने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे, पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर माणिकपूर पोलिसांनी या घटनेचा जलद तपास करून 24 तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे. तक्रारदार तरुणी सनदी लेखापाल ती वसईच्या स्टेशन परीसरात राहाते. स्टेशन पासून घर जवळ असल्याने ती नेहमीप्रमाणे रात्री उशीरा वसई रोड रेल्वे स्थानकातून घरी चालत जात होती याच दरम्यान, आरोपीने तुंगारेश्वर गल्लीत तिला अडवले आणि तिचं तोंड दाबून तिला खाली पाडून तिचा विनयभंग केला. त्यानंतर या तरुणीचा महागडा फोन घेऊन पळ काढला. खाली पडल्याने तरुणीला इजाही झाली.

.या घटनेची माहिती माणिकपूर पोलिसांना मिळताच विशेष पथक स्थापन करून आरोपीचा शोध घेण्यास सुरवात करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपीचा माग काढण्यात आला. नालासोपारा येथून संदीप खोत (35) या आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीवर मुंबईत फसवणुकीचाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे,