ईद मिलाद निमित्तानं माहिम दर्ग्याला आकर्षक रोषणाई

ईद मिलाद निमित्तानं मुंबईतल्या माहिम दर्ग्याला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. 

Updated: Dec 1, 2017, 09:15 AM IST
ईद मिलाद निमित्तानं माहिम दर्ग्याला आकर्षक रोषणाई title=

मुंबई : ईद मिलाद निमित्तानं मुंबईतल्या माहिम दर्ग्याला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. ईद आणि माहिम दर्ग्याचा मेला असा योग कित्येक वर्षांनी जुळून आला आहे. यासाठी माहिम दर्ग्याला तिरंग्याच्या रोषणाईनं सजवण्यात आलं आहे. तर काही दिवसांपूर्वी या मशिदीवर तिरंगाही फडकवण्यात आला होता. 

२ डिसेंबरला मोहम्मद पैंगबर यांचा जन्मदिन 

दरम्यान २ डिसेंबरला मोहम्मद पैंगबर यांच्या जन्मदिन निमित्त ३० फूट लांब आणि ४ फूट रुंद असा २०० किलो वजनाचा केक कापला जाणार आहे. त्यानंतर ३ ते १२ डिसेंबर दरम्यान मकदूम शाह बाबा यांच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे दहा दिवसांचा मेला माहिम दर्ग्यात भरणार आहे. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाचा आनंद म्हणून ईद-ए-मिलाव-अल-नबी साजरा केला जातो. १ ते २ डिसेंबर असे दोन दिवस मुस्लिम बांधव हा उत्सव साजरा करत असतात. 

आदराची भावना 

पैगंबर हजरत मोहम्मद शेवटचे संदेशवाहक आणि सर्वात महान संदेष्टे मानले जातात. ज्यांना खुद्द अल्लाहने देवदूत जिब्रईलद्वारा कुराणचा संदेश दिला.

रात्रभर प्रार्थना 

या दिवसात रात्रभर प्रार्थना सुरू असते. पैगंबर मोहम्मद यांच्या प्रतीकात्मक पावलांच्या निशाणावर प्रार्थना केली जाते.  या दिवशी मोठमोठ्या मिरवणूकही काढल्या जातात. या दिवशी महम्मद हजरत यांची आठवण काढली जाते, त्यांचे विचार वाचले जातात. इस्लामचा सर्वात पवित्र ग्रंथ कुराण देखील या दिवशी वाचला जातो. याव्यतिरिक्त, लोक मक्का मदिना आणि दरगाहमध्ये जातात.