केवळ लिपापोती करणारा हा अर्थसंकल्प, शेतकऱ्यांची फसवणूक - फडणवीस

महाविकासआघाडी सरकारच्या अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीसांचा कडाडून टीका

Updated: Mar 8, 2021, 03:41 PM IST
केवळ लिपापोती करणारा हा अर्थसंकल्प, शेतकऱ्यांची फसवणूक - फडणवीस title=

मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसकल्प सादर केला. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टीका केली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की...

- 2 लाखांच्या वर असणाऱ्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही. ४५ टक्के कर्जमाफीपासून वंचित राहिले त्यांना काहीही अर्थसंकल्पात मदत मिळालेली नाही. 

- शेतकऱ्याला कुठलीही मदत नाही. वीज बिलासंदर्भात ही फसवी घोषणा केली गेली. बिलावर मोठं इंटरेस्ट दिलं गेलं. त्यामुळे सुधारणा करुन योग्य बिल दिलं जात नाही. तर त्याचा फायदा होणार नाही.

- जुने प्रोजेक्ट किंवा केंद्र सरकारच्या मदतीने जे प्रकल्प होणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना केंद्र सरकारच्या आहेत. केंद्र सरकाला नावं ठेवायचे. पण यासाठी केंद्र सरकार भरीव निधी देतं हे सांगण्यात सरकार विसरलं आहे.

- हे महाराष्ट्राचं बजेट होतं की मुंबईचं हे कळतं नाही. अनेक घोषणा केलेल्या योजना आमच्या सरकारच्या काळात सुरु झालेले प्रोजेक्ट आहेत. तीर्थ क्षेत्र विकासासाठी घोषणा पण निधी जाहीर केला नाही. आमच्या सरकारच्या काळात याला निधी देण्यात आला होता. चालु कामांनाच पुन्हा दर्शवण्यात आलं आहे.

- राज्य सरकारकडून कोणताही दिलासा दिलेला नाही. पेट्रोल-डिझेलवर राज्य सरकारने एक रुपयाही कमी केला नाही. गुजरातपेक्षा मुंबईत पेट्रोल १० रुपयांनी महाग आहे. काही योजनांचं स्वागत करतो. पण कुठलीही प्रभावी योजना लागू केलेली नाही.

- रोजगारासाठी कोणतीही योजना नाही. या बजेटमध्ये जी अपेक्षा होती. केंद्र सरकारने पायाभूत सुविधांसाठी जी तरतूद केली, तसी राज्यात केली नाही.

- कोणतीही नवी योजना सरकार सुरु करु शकलेली नाही. केंद्र सरकार शिवाय राज्यात पायाभूत गुंतवणूक नाही.

- केवळ लिपापोती करणारा हा अर्थसंकल्प आहे. हा निराशाजनक अर्थसंकल्प आहे.