मुंबई : जागतिक महिला दिनाच्या (Womens Day) दिवशी महाराष्ट्रातील अर्थसंकल्प सादर केला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. महिला दिनाचे औचित्य साधून अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष अशी मोठी घोषणा करण्यात आली.
महिलेच्या घरावर नाव असावं यासाठी राजमाता जिजाऊ गृहस्वामीनी योजना. नोंदणी कुटुंबातील महिलेच्या नावे झाल्यास मुद्रांक शुल्कात सुट देण्यात येईल-@AjitPawarSpeaks https://t.co/4kRSl5SH2k#maharashtrabugdet2021#MahaBudget2021 pic.twitter.com/Yz8tp92Euk
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 8, 2021
घर विकत घेत असताना कुटुंबातील महिलेच्या नावे मुद्रांक शुल्क भरल्यास त्यावर सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे घर विकत घेत असताना कुटुंबातील महिलेच्या नावे घेणं फायदेशीर ठरेल.
महाअर्थसंकल्प अधिवेशन २०२१-२२ pic.twitter.com/8HA8SCzF4H
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 8, 2021
तसेच स्टँप ड्युटीमध्ये १ टक्के सूट मिळणार आहे. त्यामुळे महिलांच्या नावे घरं घेणं फायदेशीर ठरणार आहे. मुद्रांक शुल्कात महिलांच्या नावे होणार्या घरांचे नोंदणीत १ टक्का सवलत, यामुळे १ हजार कोटीचा महसुल कमी होण्याची शक्यता
घर हे महिलेच्या नावावर असल्यास 'राजमाता जिजाऊ गृहस्वामीनी योजना' लागू होईल. घर विकत घेताना त्याची नोंदणी कुटुंबातील महिलेच्या नावे झाल्यास मुद्रांक शुल्कात सुट देण्यात येणार आहे.