या क्षणाची सर्वात मोठी बातमी, ठाकरेंचे पुत्र एकनाथ शिंदे गटात सामील होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करणार राजकीय कारकीर्द सुरु

Updated: Jul 29, 2022, 07:11 PM IST
या क्षणाची सर्वात मोठी बातमी, ठाकरेंचे पुत्र एकनाथ शिंदे गटात सामील होणार title=

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे 40 आमदारांनंतर आता स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य शिंदे गटात सामिल होत आहेत. त्यानंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thacekray) यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

त्यातच आता ठाकरे कुटुंबातीलच एक व्यक्ती शिंदे गटात सामील होणार आहे. बिंदू माधव ठाकरे यांचे चिरंजीव आणि उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणार आहेत. 

स्मिता ठाकरेंनी घेतली शिंदेंची भेट
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सून, सामाजिक कार्यकर्त्या आणि चित्रपट निर्माती स्मिता ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. बंडानंतर एकनाथ शिंदे यांची भेट घेणाऱ्या ठाकरे कुटुंबातील त्या पहिल्याच व्यक्ती होत्या. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.