एकनाथ शिंदे गटात नाराजी की फूट? आमदारांचे वाद सोडवताना मुख्यमंत्र्यांची दमछाक?

अमरावतीमधला बच्चू कडू विरुद्ध रवी राणा वाद संपत नाही तोच जळगावात नवा वाद उफाळून आला आहे  

Updated: Oct 27, 2022, 09:28 PM IST
एकनाथ शिंदे गटात नाराजी की फूट? आमदारांचे वाद सोडवताना मुख्यमंत्र्यांची दमछाक? title=

Maharashtra Politics : अमरावतीमधला बच्चू कडू (Bachchu Kadu) विरुद्ध रवी राणा (Ravi Rana) वाद संपत नाही तोच जळगावात (Jalgaon) नवा वाद उफाळून आला आहे. पाणीपुरवठांत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) विरुद्ध पारोळ्याचे शिंदे समर्थक आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) एकमेकांविरोधात दंड थोपटून उभे ठाकलेत. गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराच्या मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिल्यानं चिमणरावांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंकडेच (CM Eknath Shinde) तक्रार केली आहे. गुलाबराव विरोधकांना बळ देत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

शिंदे गटात नाराजी की फूट? (हेडर)
मंत्रिपदावर वर्णी न लागल्यानं शिंदे गटातील अनेकजण नाराज आहेत. आमदार संजय शिरसाटांनी (Sanjay Shirsat) उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. ओवळा माजिवडा मतदारसंघ भाजपसाठी सोडण्यावरून थेट मुख्यमंत्री शिंदे आणि प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यात वादाची ठिणगी उडाली. आता अमरावतीमध्ये बच्चू कडू विरुद्ध रवी राणा यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. याच वादामुळे वेगळ्या वाटेनं जाण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय. तर भाजपनं बच्चू कडू आणि रवी राणा या दोघांनाही सबुरीचा सल्ला दिलाय.

लवकरच राज्यात महापालिका निवडणुका (Corporation Election) होणार आहेत. या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे गटाशी (Thackeray Group) दोन हात करण्याचं आव्हान एकनाथ शिंदेंसमोर आहे. स्वतःची राजकीय ताकद सिद्ध करण्याची वेळ आली असताना एकनाथ शिंदेंचा वेळ स्वपक्षातील आमदारांमधले वाद सोडवण्यातच खर्च होतोय .त्यामुळं आगामी काळात शिंदेंपुढची आव्हानं आणखी वाढणार आहेत.