Maharashtra Politics : कोकणातल्या खेडमध्ये (Khed) पाच मार्चला ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तोफ धडाडली. शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या खेडमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला. इतकंच नाही तर आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला ओपन चॅलेंजही (Challenge) दिलं आहे. आम्हाला देशद्रोही म्हणाल तर जिभ हासडून टाकू असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला (Shinde Group) थेट इशाराच दिला.
एकनाथ शिंदे देणार उत्तर
उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उत्तर देणार आहेत. ज्या ठिकाणी ठाकरेंची सभा झाली, त्याच ठिकाणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा होणार आहे. तेच खेड, तेच मैदान आणि तीच वेळ. उद्धव ठाकरेंनी खेडमध्ये घेतलेल्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमध्ये जाऊनच उत्तर देणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 19 मार्चला खेडमध्ये सभा होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेपेक्षा मोठी सभा घेण्याचं रामदास कदम आणि योगेश कदम (Yogesh Kadam) यांचं नियोजन आहे. यासभेत एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
मोदींचं नाव वापरून निवडणूक लढा
दरम्यान, खेडमधल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या नावावर निवडणुका लढवून दाखवा असं आव्हान शिंदे गटाला दिलं. शिंदे गट मतांसाठी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नाव वापरतात, पण शिवसेना नाव बाजूला ठेवा, तुमच्या आई-वडिलांचं नाव लावा आणि पक्ष बांधून दाखवा असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंच्या मॅरेथॉन सभा
खेडच्या सभेनंतर आता उध्दव ठाकरे यांची मालेगाव इथे सभा होणार आहे. 26 मार्चला उद्धव ठाकरे यांची मालेगावत सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर अमरावती आणि विदर्भात उध्दव ठाकरेंच्या सभा होणार आहेत. शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत.
नारायण राणे यांची टीका
उद्धव ठाकरे जीभ हासडण्याची भाषा कशाला करतात, त्यांनी स्वतःची जीभ सांभाळावी अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलीय. उद्धव ठाकरे यांची खेडमधली सभा पूर्णपणे मॅनेज करण्यात आली होती. सभेसाठी अनेक ठिकाणांवरन लोकं सभेसाठी आणण्यात आली होती असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरेला जनतेशी बोलता येत नाही, महाराष्ट्र किंवा विकासावर बोलता येत नाही, अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात जाणाऱ्यावर काय बोलणार अशी खिल्ली नारायण राणे यांनी उडवली.
हे ही वाचा : Sharad Pawar यांची पॉवरफूल खेळी, BJP बरोबर राष्ट्रवादी सत्तेत येणार
द्धव ठाकरेंची मंत्रालयात जाण्याची ताकद नव्हती ते राज्यभरात काय फिरणार, 20 पावलं फिरू शकत नाहीत ते इतरांवर घणाघात काय करणार ? असा सावल राणेंनी विचारला. उद्धव ठाकरेंनी स्वतःची जीभ सांभाळावी, ते इतरांची जीभ काय हासडणार. 40 आमदार शिंदेंच्या सोबत गेले त्यांना हे थांबवू शकले नाही अशी टीकाही राणेंनी केली.
तेच ठिकाण, तेच मैदान आणि तीच वेळ... मुख्यमंत्री 'या' दिवशी देणार उद्धव ठाकरेंना उत्तर