आताची सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार, सूत्रांची माहिती

दिल्लीत वेगवान घडामोडी, देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

Updated: Jun 28, 2022, 04:22 PM IST
आताची सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार, सूत्रांची माहिती title=

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातलं सध्याचं महाविकास आघाडी सरकार धोक्यात असून लवकच भाजपचं सरकार येणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रातल्या राजकारणावर दिल्लीतही वेगवान घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत फडणवीस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. 

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महेश जेठमलानीही दिल्लीला गेले आहेत. 

नव्या संभाव्य सरकारचा मंत्रीपदाचा फॉर्म्युलाही समोर आलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणविस मुख्यमंत्री  असतील तर 
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे.  शिंदेना वित्ता किंवा नगरविकास खातं दिलं जाऊ शकतं.