Big Breaking । ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर

Sanjay Raut Gets Bail in Pantra Chawl Land Scam : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. (Maharashtra Political News) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.  

Updated: Nov 9, 2022, 02:41 PM IST
Big Breaking । ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर title=

Sanjay Raut get bail: आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. (Maharashtra Political News) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊत यांना ईडीने दणका दिला होता. (Pravin Raut Property confiscated by ED) आज या दोघांच्याही जामीन अर्जावर निकाल आला आहे. संजय राऊत यांना विशेष पीएमएलए न्यायालयात मोठा दिलासा दिला आहे. (Sanjay Raut Gets Bail in Pantra Chawl Land Scam)

ईडीनं (ED) जामिनाला विरोध करताना संजय राऊत हे प्रभावशाली व्यक्ती असून ते बाहेर पडल्यावर साक्षीदारांवर दबाव आणतील, अशी भीती व्यक्त केली होती. तर प्रवीण राऊत यांनी संजय राऊत यांना पैसे दिल्याचा कुठलाही पुरावा ईडीनेने सादर केलेला नाही, असा दावा राऊतांचे वकील प्रदीप मुंदरगी यांनी केला होता. शेवटच्या सुनावणीवेळी न्यायालयाने संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला होता. आज याबाबत निकाल देताना राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. तसेच संजय राऊत यांचे निकटवर्ती प्रवीण राऊत (Pravin Raut) यांनाही जामीन मिळाला आहे.

संजय राऊत 102 दिवसांनी तुरुंगातून बाहेर येणार !

मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने आदेश देताना मोठा दिलासा दिला. राऊत यांना तीन महिन्यानंतर जामीन मंजूर केला आहे. पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर मुंबईतील विशेष न्यायालय बुधवारी आपला आदेश आहे.

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) संबंधित खटल्यांच्या सुनावणीसाठी नियुक्त केलेले विशेष न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर गेल्या आठवड्यात निर्णय राखून ठेवला होता. आज याचा निकाल देताना संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. राऊत यांनी जामीन मिळाल्याने ठाकरे गटाच्या शिवसेनेत मोठा जल्लोष करण्यात येत आहे. 

मुंबईतील आर्थर रोड कारागृहात संजय राऊत आहे. राऊत यांनी त्यांच्या जामीन याचिकेत दावा केला होता की त्यांच्यावरील खटला "सत्तेचा गैरवापर" आणि "राजकीय सूडबुद्धीचे" मोठे उदाहरण आहे.

पत्रा चाळ पुनर्विकासाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्याने मोठी भूमिका बजावली आणि पैशाचा माग टाळण्यासाठी 'पडद्यामागे' काम केले असे म्हणत ईडीने राऊत यांच्या याचिकेला विरोध केला होता. पत्रा चाळच्या पुनर्विकासात कथित आर्थिक अनियमितता आणि त्यांची पत्नी आणि सहकारी यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांशी संबंधित ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.