"मातोश्रीवर खोके येणं बंद झाल्याची रश्मी ठाकरेंना खंत"; शिवसेना नेत्याची टीका

संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळतेय असेही शिवसेना नेत्यांनी म्हटले आहे

Updated: Nov 9, 2022, 01:04 PM IST
 "मातोश्रीवर खोके येणं बंद झाल्याची रश्मी ठाकरेंना खंत"; शिवसेना नेत्याची टीका title=
(फोटो सौजन्य - PTI)

मुंबई : 40 आमदारांच्या फूटीनंतर अद्यापही शिवसेनेतून (Shivsena) गळती सुरुच आहे. शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) आता ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शिवसेनेतील फूटीनंतर दोन्ही गटांनी पुन्हा एकत्र यावे असे दीपाली सय्यद यांनी वारंवार म्हटले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) - देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) सरकार स्थापन झाल्याने आता दीपाली सय्यद शनिवारी शिंदे गटात (Shinde group) प्रवेश करणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सक्रिय असणाऱ्या दिपाली सय्यद सत्तातरानंतर फारशा सक्रिय दिसल्या नाहीत. त्यामुळे सय्यद या नाराज असल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर आता दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यासाठी त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर आरोप केलेत. खऱ्या सूत्रधार रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आहेत असे दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

"सगळीकडे खोके खोके म्हटलं जातय. पण खोक्यांचे खरे राजकारण काय आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे. मुंबई महानगरपालिका कोणाच्या ताब्यात आहे हे कळलं पाहिजे. ही गद्दारी नाही तर हक्क आहे," असे दीपाली सय्यद म्हणाल्या.

"संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा झालीय. पक्ष तोंडाने कसा फोडला जावू शकतो याचे ते उत्तम उदाहरण आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टी घडत गेल्या आहेत आणि दोन वेगळे गट झाले. एकनाथ शिंदे यांनी मला शिवसेनेत आणलं त्यामुळे त्यांच्यासोबत उभं राहणं माझं कर्तव्य आहे," असेही दीपाली सय्यद म्हणाल्या.

"मुंबई महानगर पालिकेतील खोके मातोश्रीवर येणे बंद झाल्याची खंत रश्मी ठाकरे यांना झाली आहे. निलम गोऱ्हे, सुषमा अंधारे चिल्लर आहेत तर यामध्ये सुत्रधार रश्मी ठाकरे आहेत," असा आरोपही दीपाली सय्यद यांनी केला आहे.