Masks Mandatory : राज्यात पुन्हा मास्क सक्ती?

राज्याच्या जनेतला पुन्हा एकदा मास्क घालून (Masks Mandatory) फिरावं लागण्याची शक्यता आहे.  

Updated: Dec 8, 2022, 09:12 PM IST
Masks Mandatory : राज्यात पुन्हा मास्क सक्ती? title=

मुंबई : राज्यात गोवरचा (Measles) कहर वाढतच चाललाय. मुंबईपाठोपाठ राज्यातील विविध भागात गोवरच्या साथीचा उद्रेक होतोय. आतापर्यंत 18 चिमुकल्यांचा बळी घेणाऱ्या गोवरला आळा घालण्यासाठी नवा उपाय सुचवण्यात आलाय. काय आहे हा उपाय, चला पाहुयात. (maharashtra measles update in state may be masks mandatory)

राज्यात पुन्हा मास्क सक्ती?

राज्याच्या जनेतला पुन्हा एकदा मास्क घालून फिरावं लागणार आहे. कारण राज्यात मास्क सक्ती करण्यात येणार असल्याचं समजतंय. जीवघेण्या गोवरनं महाराष्ट्रात डोकं वर काढलंय. गोवरची बाधा झाल्यानं आतापर्यंत 18 बालकांना आपली जीव गमवावा लागला. या गोवरच्या साथीला आळा घालण्यासाठी मास्क सक्तीचा उपाय तज्ज्ञांनी सुचवलाय. 

मास्क लावा, गोवर टाळा

गोवर हा श्वसनप्रक्रियेत अडथळा आणणारा आजार आहे.  गोवरबाधितांच्या थुंकीतून हा आजार पसरतो. थुंकीवाटे कोरोना पसरण्याचं प्रमाण एकास दोन असं होतं. मात्र एका गोवरबाधित मुलामुळं 12 ते 14 मुलांमध्ये हा आजार पसरू शकतो. त्यामुळं गोवरचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी मुलांना मास्क घालणं बंधनकारक करायला हवं, असं मत राज्याच्या गोवर प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे यांनी व्यक्त केलंय. गोवर नियंत्रणासाठी राज्य सरकारनं खास टास्क फोर्सची स्थापना केलीय. गोवर रोखण्यासाठी राज्यभरात लवकरच विशेष लसीकरण मोहीम देखील हाती घेण्यात येणाराय. मात्र तोपर्यंत आपल्या चिमुकल्यांना गोवरपासून वाचवायचं असेल तर पालकांनीच मुलांना मास्क घालण्याची सवय लावण्याची गरज आहे.