महाराष्ट्र ओरबाडून गुजरातचा विजय मिळवला, उद्धव ठाकरेंचा थेट मोदींवर हल्लाबोल!

महाराष्ट्र ओरबाडून गुजरातचा विजय मिळवला असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.

Updated: Dec 8, 2022, 05:52 PM IST
महाराष्ट्र ओरबाडून गुजरातचा विजय मिळवला, उद्धव ठाकरेंचा थेट मोदींवर हल्लाबोल!  title=

मुंबई : गुजरातमध्ये मोठे यश मिळवून भाजपने सलग सातव्यांदा सत्तेवर येण्याचा इतिहास रचला आहे. (gujarat assembly election result 2022)  गुजरातच्या निकालावर उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला केला आहे. मुंबईवर घाला घालण्याचा प्रयत्न झाला असून विजयासाठी महाराष्ट्र छिन्न विछिन्न करण्याचाही प्रयत्न केला. महाराष्ट्र ओरबाडून गुजरातचा विजय मिळवला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.  (Uddhav Thackeray Criticizes PM Narendra Modi over BJP Win in Gujarat Election Press Conference Maharashtra Political Crisis Marathi News)

काय म्हणाले उद्धव ठाकरे-

गेल्यावेळी गुजरात, हिमाचल आणि दिल्लीमध्ये भाजप जिंकला होता. यावेळी मात्र दिल्लीत आप, हिमाचलमध्ये कॉंग्रेस आणि गुजरातमध्ये भाजप जिंकली आहे. गुजरातमध्ये भाजपने अभूतपूर्व यश मिळवलं आहे. यशाचे मानकरी आहेत त्यांचे अभिनंदन करणार आहोत. गुजरातच्या विजयामध्ये महाराष्ट्रामधून पळवलेल्या उद्योगांचे योगदान आहे हे कोणी विसरु नये. एका बाजूला महाराष्ट्र ओरबाडला. गुजरातच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील उद्योग पळवले. तसेच कर्नाटकातील निवडणूक समोर ठेवून महाराष्ट्रातील गावे तोडली जातील की काय अशी भीती निर्माण झाली असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (Narendra Modi) जादू पुन्हा चालल्याचं पहायला मिळालं आहे. नरेंद्र मोदी यांच्या झुंजावती दौऱ्यांमुळे काँग्रेसच्या (Congress) हातावरचा मळ देखील निघाला नाही. काँग्रेस कशीबशी 20 पर्यंत पोहोचल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे भाजपने (BJP) 150 चा आकडा गाठला आहे. त्यामुळे आता गुजरातमध्ये पुन्हा भाजपच गरबा खेळणार जाणार असल्याचं स्पष्ट दिसतंय.