मुंबई : Maharashtra Budget Session 2022 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचे विधिमंडळात आज भाषण होणार होते. मात्र, विरोधकांनी जोरदार खेळी करत वीज कनेक्शनचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. वीज कनेक्शन तोडणे यावरून विरोधकांनी घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली आणि गोंधळ घालण्यास सुरुवात केली. (BJP MLA confusion) त्यामुळे विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. (Maharashtra legislative assembly adjourned For the whole day over Power connection issue)
राज्यपाल अभिभाषण चर्चा सुरु होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर देणार होते. मात्र, भाजपकडून विधानसभेत गोंधळ घालण्यात आला. त्यामुळे विधिमंडळात सुरू असलेल्या गोंधळामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात येणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विधानपरिषदेतही मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती देण्यात आली.
वीज कनेक्शनचा मुद्दा सभागृहात उपस्थित करत भाजपच्या सदस्यांनी जोरदार गोंधळ घातला. खूनी सरकार हाय हाय, अजित पवार उत्तर द्या…ठाकरे सरकार होश मे आये, अशा घोषणा भाजप आमदार देत होते.
राज्यपाल अभिभाषण चर्चा गोंधळात पुरवणी चर्चा आणि मतदान घेण्यात आले. महसूल , नगरविकास, उद्योगसंबंधी प्रश्नावर चर्चा करण्यात आली. तसेच पुरवणी मागण्याबाबत चर्चा सुरू होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागणी 2021-22 या वर्षाच्या मान्य केल्या. त्यानंतर विधानसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. यावेळी भाजपच्या आमदारांची जोरदार घोषणाबाजी सुरूच होती.