Thirty First Guideline | राज्य सरकारकडून थर्टी फर्स्टसाठी नवी नियमावली जाहीर, पाहा काय आहेत निर्बंध?

लोकं थर्टी फर्स्ट (Thirty First Celebration) आणि न्यू इअर सेलिब्रेशनच्या New Year Celebration) मूडमध्ये आहेत. या थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गृहविभागाने (Maharashtra Home Ministry Guideline) नियमावली जाहीर केली आहे.   

Updated: Dec 29, 2021, 08:42 PM IST
Thirty First Guideline | राज्य सरकारकडून थर्टी फर्स्टसाठी नवी नियमावली जाहीर, पाहा काय आहेत निर्बंध?  title=

मुंबई : राज्यात कोरोनाचा (Corona) आणि त्याचा नातेवाईक असलेला ओमायक्रॉनने (Omicrone) हैदोस घातला आहे. मुंबईत तर गेल्या 24 तासात दुप्पट कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. एका बाजूला कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तर दुसऱ्या बाजूला लोकं थर्टी फर्स्ट आणि न्यू इअर सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत. या थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गृहविभागाने (Maharashtra Home Ministry Guideline) नियमावली जाहीर केली आहे. (maharashtra home ministry announced guidelines over to thirty First celebration guideline)

या नियमावलीनुसार, गृहविभागाने काही निर्बंध घालून दिले आहेत. त्यानुसार बंदिस्त ठिकाणी एकूण क्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे. 

अशी आहे नियमावली...

बंदिस्त सभागृहात कार्यक्रमाला एकूण क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत परवानगी आहे. खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी फक्त 25 टक्के उपस्थितीची परवानगी आहे. समुद्रकिनारी, बागेत आणि रस्त्यावर गर्दी करू नये, असंही आवाहन केलं गेलं आहे. 

६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी आणि 10 वर्षांखालील मुलांनी घराबाहेर पडू नये.मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि यासारख्या पर्यटन स्थळी गर्दी करू नये. 

नव वर्षाच्या स्वागतासाठी कार्यक्रम आयोजित करू नये, मिरवणूक काढू नये, असंही आवाहन करण्यात आलं आहे.  

अनेक जण नववर्षाचं स्वागत फटाके फोडून करतात. मात्र नववर्षाच्या स्वागतासाठी फटक्यांची आतिषबाजी करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.