दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: येत्या २१ तारखेपासून कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात येणार आहेत. रेड झोनमधील १२ महापालिका वगळून इतर जिल्हे आणि ग्रामीण भागातील परिस्थितीनुसार उद्योग-व्यापार सुरु करण्यात येतील. यासंदर्भात आज सरकारकडून तपशिलवार माहिती जाहीर करण्यात आली.
२१ एप्रिलपासून कोणते व्यापार आणि कार्यालयं सुरु होणार?
मनरेगा
* मनरेगा काम सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सुरू होणार
* सिंचन आणि पाणी वाचवण्याच्या संबंधाबाबत कामे मनरेगामध्ये प्राधान्याने सुरू होणार
खासगी क्षेत्र
* इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि DTH केबल सर्व्हिस
* IT आणि त्यासंबंधित सेवा सुरू राहतील पण ५०% कर्मचारी काम करणार
* डेटा आणि कॉल सेंटर कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरू राहणार
* ग्रामपंचायत स्तरावरील सरकारमान्य सेवा सुविधा केंद्र (common service center) सुरू राहणार
* ई-कॉमर्स कंपनी
* कुरियर सर्व्हिस
इंडस्ट्री
* घाऊक आणि वितरण सेवा (wholesale and distribution)
* प्रतिबंध क्षेत्र वगळून Sez, industrial estate आणि industrial township मध्ये उत्पादन करणारे कारखाने सुरू होणार
* कारखान्याच्या परिसरात कामगारांच्या राहण्याची व्यवस्था करावी
* कामाच्या ठिकाणी कर्मचारी येण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करावी, त्यात social distancing पाळावे
* प्रतिबंधात्मक क्षेत्रातून कोणतीही व्यक्ती अशा ठिकाणी कामावर येऊ शकणार नाही
* प्रतिबंधित क्षेत्र वगळून ग्रामीण भागातील कारखाने
* फळे आणि फुले यासंबंधित प्रोसेसिंग,पॅकेजिंग आणि वाहतूक सेवा सुरू राहणार
* बांधकाम संबंधित काम (प्रतिबंधित क्षेत्र वगळून)
* रस्ते, सिचन प्रकल्प, इमारत बांधकाम उद्योग संबंधित प्रकल्प
* मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात बांधकाम कामांसाठी बाहेरून कामगार आणावे लागणार नाहीत अशा कामाबाबत आयुक्तांनी निर्णय घ्यावा
* मान्सून पूर्व अत्यावश्यक कामे सुरू होणार
* राज्य सरकारच्या कार्यालयात
* सचिव, सहसचिव , उपसचिव यांनी आपल्या खात्यात १० % कर्मचाऱ्यांची उपस्थितीत काम करावे
* महापालिका क्षेत्र वगळून ग्रामीण भागात बांधकाम, पायाभूत सुविधांची कामे करण्यास परवानगी