Maharashtra Corona Update | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, ओमायक्रॉनचे रुग्ण किती?

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona Update) आज शुक्रवारी (7 जानेवारी) मोठी वाढ झाली आहे. 

Updated: Jan 7, 2022, 09:51 PM IST
 Maharashtra Corona Update | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, ओमायक्रॉनचे रुग्ण किती?  title=

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona Update) आज शुक्रवारी (7 जानेवारी) मोठी वाढ झाली आहे. राज्यात आज 40 हजार 925 नव्या कोरोना रुग्णांचं निदान झालं आहे.  गुरुवारच्या तुलनेत राज्यात साडे चार हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी राज्यात 36 हजार 265 कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. कोरोनामुळे दिवसभरात एकूण 20 रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर हा 2.07 टक्के इतका आहे.  (maharashtra corona update today 7 january 2022 in state today found 40 thousand 925 corona patients)   

ओमायक्रॉनचे रुग्ण किती? 

कोरोनाचा रुग्णसंख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला काहीशी दिलासादायक बातमी आहे. राज्यात आज एकही ओमायक्रॉनचा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे राज्यासाठी आणि पर्यायाने काहीसा का होईना, पण दिलासा मिळाला आहे.

मुंबईतही रुग्णांमध्ये वाढ 

महानगरी मुंबईत आज कोरोनाचे 20 हजार 971 रुग्ण आढळले आहेत. तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 8 हजार 490 जण दिवसरात कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान दुसऱ्या बाजूला अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा झाली आहे. पोलीस कर्मचारी आणि मुंबई महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनाही कोरोनाने गाठलं आहे. 

लवकरच नवी नियमावली

राज्यातील वाढत्या कोरोनाचा जोर पाहता आज रात्री किंवा उद्यापर्यंत नवी नियमावली जाहीर होणार आहे. नेमके काय निर्बंध लावले जाणार, याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे.