पंतप्रधानांच्या बुस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीकरणाच्या घोषणेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लहान मुलांच्या लसीकरणाबाबत (Child Vaccination) आणि बुस्टर डोसबाबत (Booster Dose) मोठी घोषणा केली. 

Updated: Dec 25, 2021, 11:16 PM IST
पंतप्रधानांच्या बुस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीकरणाच्या घोषणेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?   title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काही वेळेपूर्वी लहान मुलांच्या लसीकरणाबाबत (Child Vaccination) आणि बुस्टर डोसबाबत (Booster Dose) मोठी घोषणा केली. या घोषणेनुसार नववर्षापासून लहान मुलांच्या लसीकरण मोहिमेला 3 जानेवारी 2022 पासून तर कोरोना योद्ध्यांना 10 जानेवारी 2022 पासून बुस्टर डोस दिला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या घोषणेचं स्वागत केलं. (maharashtra Chief Minister uddhav thackeray welcomed announcement of Prime Minister to give booster dose for corona frontline workers and child vaccination)

"बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती. तसेच आमची ती मागणी होतीच असे मुख्यमंत्री म्हणाले.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील 7 डिसेंबरला पत्र लिहून मुलांना लसीकरण करण्याची तसेच बूस्टर डोस देण्याची विनंती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केली होती.

"संसर्ग रोखण्यासाठी निश्‍चितपणे मदत" 
 
याशिवाय पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांना देखील लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्‍चितपणे मदत होईल तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

1.40 लाख ICU बेड्स आहेत

90 हजार बेड्स मुलांसाठी आहेत

4 लाख ऑक्सिजन किट्स राज्यांना दिल्या

141 कोटी लोकांना लस दिली

61% लोकांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले

100% लसीकरण गोवा आणि हिमाचल प्रदेशात झाले

राज्यांना मदत केली जात आहे