Pankaja Munde Interview: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी झी 24 तासच्या जाहीर सभा कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तरे दिली. ज्या गोष्टी मी स्वत: पाळेन आणि भविष्यात मला वक्तव्य बदलावं लागणार नाही, असे बोलण्याचा प्रयत्न मी करते. महायुतीचे सरकार आणण्यासाठी आम्ही रणांगणात उतरल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान पंकजा मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीत अशीही एक वेळ आली होती जेव्हा त्यांनी राजकारण सोडण्याची धमकी आपल्या कार्यकर्त्यांना दिली होती. पण अशी वेळ का आली होती? काय होता तो प्रसंग जाणून घेऊया.
माझा मेळावा ही परंपरा आहे. माझ्या मेळाव्याची दशकपूर्ती होती.जरांगेंच्या मेळाव्याशी मी संबंध लावत नाही. ती त्यांची सुरुवात होती असेल, असे त्या म्हणाल्या. माझा झालेला पराभव हा काही हजारांचा होता. लाख दीड लाख मतांचा पराभव हा पराभव असतो असे मी मानते. तेव्हा भावना तीव्र असतात. पण माझ्या मागे मतदार आहेत. यावेळी बॅलेट पेपरवर पहिल्यांदाच कमळ नसणार असे सांगताना कार्यकर्त्याच्या डोळ्यात पाणी होते. पण पक्षाचा निर्णय आहे. असे निर्णय घ्यावे लागतात, असे त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री व्हाव अशी कार्यकर्त्यांच्या मनात इच्छा असते. यावर खुद्द पंकजा यांना काय वाटत? याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत आपला नेता मोठा व्हावा. त्यामुळे आपला नेता मुख्यमंत्री व्हावं असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं. पण आम्हाला ते वाटायला हवं, असेही त्यांनी पुढे सां
दक्षिणेकडे एखाद्या नेत्यासाठी आत्महत्या करतात. पंकजा मुंडे यांचा पराजय झाला तेव्हा काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या होत्या. याबद्दल पंकजा मुंडे यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. माझ्या पराभवासारख्या घटना मी अनुभव म्हणून पाहते. माझ्या वडिलांच्या जाण्यानंतर आत्महत्या झाल्या त्यामुळे मी खचले. माणूस जपायला हवा असं मला नेहमी वाटतं. मी कार्यकर्ते संभाळते. मी त्यांना जीव लावते. मला काही झालं तर ते गमछा डोळ्याला लावून रडतात. त्यांचा विश्वास, समर्पण आणि माझं धैर्य कामाला येतं, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
तुमच्या पराभवानंतर कोणीतरी आत्महत्या करतं. तुम्ही खूप लकी आहात, असं कोणीतरी म्हटलं. तेव्हा मी डोक्यावर हात मारुन घेतला. राजकारणात कोणीतरी याला लकी मानत हेच धक्कादायक आहे. आपल्यासाठी कोणाचाही जीव जाणे ही अपराधी भावना आहे. मी पत्रकार परिषद घेऊन धमकी दिली. आता असे प्रकार घडले तर मी राजकारण सोडेन, असे मी म्हटल्याचे त्यांनी सांगितले.