राज्यात तब्बल 661 शाळा अनधिकृत, रॅकेटची शक्यता... SIT चौकशीची मागणी

राज्यात अनधिकृत शाळांचं पेव फुटलं आहे. राज्यातील तब्बल 661 शाळा अनधिकृत असल्याचं समोर आल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात आलं आहे. पावसाळी अधिवेशात अनधिकृत शाळांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून भाजप आमदार आशिष शेलार यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली.

गणेश कवडे | Updated: Jul 21, 2023, 03:04 PM IST
राज्यात तब्बल 661 शाळा अनधिकृत, रॅकेटची शक्यता... SIT चौकशीची मागणी title=

मुंबई : अनध‍िकृत शाळांची (Unauthorized School) संख्या पाहता याबाबत कोणते रॅकेट (Racket) आहे की, काय असा प्रश्न पडतो त्यामुळे या प्रकरणी एसआयटी (SIT)  नियुक्त‍ करुन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा आमदार ॲड आश‍िष शेलार (Ashish Shelar) यांनी आज  विधानसभेत केली.  राज्यात श‍िक्षण विभागाने केलेल्या पाहणीमध्ये 1300 पैकी 800  शाळा या कागदपत्रातील तृटींमुळे अनध‍िकृत ठरल्याची बाब निदर्शनास आल्याबाबत तारांकीत प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. याला उत्तर देताना शालेय श‍िक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी  661 खाजगी शाळा या अनध‍िकृत आढळल्याचं सांगतिलं. या अनध‍िकृत शाळांवर कारवाई, दंड आण‍ि फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिल्याचेही केसरकर यांनी सांगितलं. 

आश‍िष शेलार यांनी शाळांच्या परवानग्यांमध्ये दिसून येणारी ही दिरंगाई पाहता यामध्ये कोणते रॅकेट काम करतेय का असा प्रश्न पडतो त्यामुळे या प्रकरणी एसआयटी नियुक्त करुन चौकशी करण्यात यावी अशी त्यांनी केली. त्यावर उत्तर देताना मंत्र्यांनी उच्चस्थरिय चौकशी करण्याचे मान्य केलं.

पु्ण्यात बारा शाळा अनधिकृत
पुणे जिल्ह्यात एक दोन नाही तर तब्बल 12 शाळा अनधिकृत असल्याचं उघडकीस आलं होतं. अनधिकृत शाळांमध्ये पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर, खेड, दौंड, मुळशी आणि हवेली तालुक्यातल्या शाळांचा समावेश आहे. त्यामुळं या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका असं आवाहन पुणे जिल्हा परिषदेनं केलं.आपल्या मुलांनी चांगल्या शाळेत जावं, चांगलं शिक्षण व्हावं असं म्हणत मुलांच्या शैक्षणिक आयुष्याच्या दृष्टीनं पालक अनेकदा चांगल्यातील चांगली शाळा निवडण्याच्या प्रयत्नांत असतात. प्रत्येक पालकाचे शाळा निवडण्याचे निकष विविध घटकांवर अवलंबून असतात.  पाल्यांचं हित हाच एकमेव हेतू इथं केंद्रस्थानी असतो. पण, अनअधिकृत शाळांमुळे पालकांच्या अपेक्षा आणि विद्यार्थ्यांची स्वप्न यांची राखरांगोळी होतेय.

ठाणे जिल्ह्यात चालविण्यात येणाऱ्या अनधिकृत शाळांवर ठाणे जिल्हा परिषद मार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात 27 माध्यमिक शाळा अनधिकृत आहेत. यापैकी 10 अनधिकृत शाळा असल्याचं समोर आलं होतं. तर मुंबईत 210 बेकायदा शाळा असल्याचंही निदर्शनास आलं होतं. 

शाळाबाह्य मुलांसाठी सिग्नल शाळेसारख्या शाळा सुरु करा
दरम्यान, शाळाबाह्य मुलांसाठी ठाण्यात सुरु झालेल्या सिग्नल शाळे सारख्या शाळा सुरु करा, अशी मागणी आमदार अँड आशिष शेलार यांनी तारांकित प्रश्नावर बोलताना केली. याबाबत उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले की, सन 2022 23 मध्ये राज्यात आढळून आलेल्या 9305 शाळाबाह्य बालकांपैकी 9004 बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात सरकारला यश आलं आहे. 30 जून 2022 च्या शासन निर्णयानुसार तीन ते अठरा वयोगटातील शाळाबाह्य व स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी "मिशन झिरो ड्रॉप आउट" या नावाने  5 जुलै  ते  20 जुलै 2022 या कालावधीमध्ये मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत सन 2022- 23 मध्ये राज्यात 4,650 मुले आणि 4,675 मुली असे एकूण 9305 बालके शाळाबाह्य आढळून आली होती.