लॉकडाऊन : कोरोनाचे संकट असताना मुंबईत टिकटॉक व्हिडिओ करणाऱ्या महिलेला अटक

कोरोनाचा फैलाव होत असल्याने लॉकडाऊन आणि संचारबंदी राज्यशासनाकडून करण्यात आली आहे. तरीही काहीजण याचे उल्लंघन करताना दिसत आहेत. 

Updated: Mar 28, 2020, 02:58 PM IST
लॉकडाऊन : कोरोनाचे संकट असताना मुंबईत टिकटॉक व्हिडिओ करणाऱ्या महिलेला अटक title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोनाचा फैलाव होत असल्याने लॉकडाऊन आणि संचारबंदी राज्यशासनाकडून करण्यात आली आहे. तरीही काहीजण याचे उल्लंघन करताना दिसत आहेत. मुंबईतील सामसूम रस्त्यांवर टिकटॉक व्हिडिओ करणारे महाभाग आता पोलिसांच्या रडारवर आहेत. रेहान फिरोज खानला पोलिसांनी अटक केली आहे. ४८ वर्षीय रेहानवर राष्ट्रीय व्यवस्थापन कायदा तसेच महाराष्ट्र कोविड 19 उपाय योजना कायद्याखाली गुन्हा नोंदवलाय. रेहानने बीपीटी रोडवर टिकटॉक व्हिडिओ करून व्हायरल केला. आर सी एफ पोलिसांनी अटक केली आहे.अटकेनंतर मात्र पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन रेहान करत आहे.

लॉकडाऊनचं गांभीर्य नाही, कोरोना पसरतोय, याचीही भीती नाही. फक्त नको तिथे जास्त शहाणपणा करण्याची काही जणांची खोड जात नाहीय. अशा दीड शहाण्यांना पोलिसांनी अद्दल घडवली आहे. नाव - रेहाना फिरोज खान. वय - ४८ वर्ष. या मॅडम चक्क दागिने घालून, मेकअप करुन मुंबईतल्या रस्त्यांवर गाडी चालवत होत्या. बीपीटी रोडवर या मॅडम ड्रायव्हिंग करत होत्या. त्याचा टिकटॉक व्हिडीओही तयार केला. हे सगळं करण्याचा उद्देश एकच, तो म्हणजे लॉकडाऊनला धाब्यावर बसवून मुंबईत आपण कसे बिनधास्त फिरतोय हे दाखवणं. अखेर पोलिसांनी चमकोगिरी करणाऱ्या या मॅडमला अटक केली. अटक केल्यावर मात्र टिकटॉकची सगळी मस्ती उतरली आणि माफीची भाषा बोलू त्या बोलू लागल्यात.

बाईकवरुन फिरणाऱ्यांची खैर नाही!

धुळ्यातला हा काल्या दादा. धुळ्यातला स्वयंघोषित दादा. हा खुशाल बाईकवरुन फिरत होता. एवढंच नव्हे तर इतरांनाही घराबाहेर पडण्याचं आवाह करत होता. काही तासांच पोलिसांनी त्याला पोलिसा खाक्या दाखवत ताब्यात घेतलं. मग काल्या सुतासारखा सरळ झाला. आपण चूक केल्याचं मान्य केलं. अशी चूक इतरांनी करु नये असं आवाहनही केलं. कोरोना होऊ नये म्हणून देशात लॉकडाऊन केलंय.