मुंबईतल्या चांदिवलीमध्ये भुस्खलन

 चांदिवलीमध्ये भुस्खलन झाल्याची घटना घडली आहे. संघर्षनगरमध्ये भुस्खलनामुळे ६० ते ७० फुटांचा खड्डा पडला. त्यामुळे आसपासच्या ४ झोपड्या खड्ड्यात गेल्या आहेत. तर बाजुची ७ मजली इमारत रिकामी करण्यात आली आहे. या इमारतीत एकूण २२ कुटुंबिय रहात होते.

Updated: Jun 27, 2017, 09:54 AM IST
मुंबईतल्या चांदिवलीमध्ये भुस्खलन title=

मुंबई : चांदिवलीमध्ये भुस्खलन झाल्याची घटना घडली आहे. संघर्षनगरमध्ये भुस्खलनामुळे ६० ते ७० फुटांचा खड्डा पडला. त्यामुळे आसपासच्या ४ झोपड्या खड्ड्यात गेल्या आहेत. तर बाजुची ७ मजली इमारत रिकामी करण्यात आली आहे. या इमारतीत एकूण २२ कुटुंबिय रहात होते.

खबरदारीचा उपाय म्हणून ही इमारत रिकामी करण्यात आली आहे. येथे एका इमारतीचं काम सुरू आहे. या इमारतीच्या बिल्डरमुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला.