मुंबई : राजभवनातील क्रांतिकारक गॅलरीचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मुख्य़मंत्र्यांनी बोलताना पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत असलेल्या या वास्तूच्या उद्घाटनाबाबत चांगला मुहूर्त असल्याचं म्हटलं आहे.
'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना क्रांतिगाथा या दालनाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं. एक चांगला मुहूर्त आहे. जे स्वातंत्र्य आपण भोगतोय त्यासाठी किती लोकांनी बलिदान दिलं. स्वातंत्र लढून मिळवावं लागलं. तो इतिहास जिवंत करणं आपलं काम आहे.' असं मुख्यमंत्री म्हणाले.
'पुढच्या पिढीला ज्या गोष्टी द्यायच्या आहेत. ते केलं नाही तर आपण आपल्या कर्तव्याला भुगतो आहे. हा भुयार सापडला तेव्हा विद्यासागर राव यांनी बोलावलं होतं. पण तेव्हा जाणं झालं नाही.'
'अनेक क्रांतीकारकांनी काम केलं त्याचं एक पुस्तक झालं पाहिजे. बोलत बसण्यापेक्षा एक जरी कण देशासाठी आपण करु शकलो तर ते कृतार्थ होतील.' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.