पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं स्वागत

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार 

Updated: Jun 14, 2022, 04:45 PM IST
पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं स्वागत title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी  यांच्या हस्ते आज श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. लोकार्पण सोहळ्यानंतर मोदींची सभा झाली. त्यानंतर पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. 

थोड्याचवेळातपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबई विमानतळावर आगमन झालं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. यावेळी त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. 

राजभवनातील क्रांतीकारी गॅलरीचं उद्धाटन मोदींच्या हस्ते होणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार असल्याने मोदी आणि ठाकरे एकत्र येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन होणार आहे. जल भूषण इमारत हे 1885 सालापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. जुनी इमारत पाडून नवी इमारत बांधण्यात आली आहे.