मध्यरात्र..फुटपाथ..6 महिन्याचं बाळ आणि रिक्षातून बाहेर आलेला 'तो' इसम..थरकाप उडवणारी घटना

Kalyan Crime: मध्यरात्र...कल्याण शहरातील फुटपाथ..निरव शांतता..भंगार गोळा करणारी महिला रात्रीच्या सुमारास येथे फुटपाथवर झोपलीय. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 10, 2024, 05:20 PM IST
मध्यरात्र..फुटपाथ..6 महिन्याचं बाळ आणि रिक्षातून बाहेर आलेला 'तो' इसम..थरकाप उडवणारी घटना  title=
Kalyan Crime

Kalyan Crime: तुमच्या मुलांवर तुमचं लक्ष आहे का? असा प्रश्न विचारणारा 'रेगे' हा सिनेमा काही वर्षांपुर्वी येऊन गेला. दरम्यान आपल्या मुलांकडे लक्ष नसल्यावर काय होऊ शकतेय याची प्रचिती एका आईला आली. तिच्यापासून तिचं अवघ्या 6 महिन्यांचं बाळ हिरावलं गेलं होता. काय घडली घटना? पुढे काय झालं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

मध्यरात्र...कल्याण शहरातील फुटपाथ..निरव शांतता..भंगार गोळा करणारी महिला रात्रीच्या सुमारास येथे फुटपाथवर झोपलीय. अशावेळी तिच्या सहा महिन्याचे चिमुकल्याचे अपहरण झाल्याची घटना कल्याण पश्चिम परिसरात घडली होती. 

विशेष म्हणजे सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. त्यामुळे आरोपीपर्यंत लवकरच पोहोचता येऊ शकते असा विश्वास पोलिसांना होता. घटनेनंतर तात्काळ कल्याणच्या महात्मा फुले  पोलिस स्थानकातील पोलीस कामाला लागले. त्यांनी वेगाने कारवाई सुरु केली. 

परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. चोरांची ओळख पटली. आणि अवघ्या 14 तासात या चिमुकल्याचे अपहरण करणाऱ्या 2 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे 6 महिन्याच्या चिमुकल्याचे सुखरूप सुटका केली.

पाहा व्हिडीओ

दिनेश सरोज आणि अंकित कुमार राजेंद्र कुमार प्रजापती अशी या दोघांची नावे आहेत. यामधील दिनेश सरोज हा रिक्षाचालक आहे. तर अंकित कुमार हा टेलर असल्याची माहिती पोलिसांना दिली.

या दोघांनी बाळ विकण्यासाठी चोरले होते का? किंवा त्यांचा आणखी काही उद्देश होता? याचा तपासाचा पोलीस करत आहेत. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 11 जून पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली.