मुंबई लोकलमध्येही 'काला चष्मा'ची जादू, Videos तुफान व्हायरल

 'काला चष्मा' या गाण्याची जादू मुंबईच्या लोकल ट्रेनमध्येही दिसू आली. 

Updated: Sep 3, 2022, 06:22 PM IST
मुंबई लोकलमध्येही 'काला चष्मा'ची जादू, Videos तुफान व्हायरल title=
kala chashma trend at mumbai local train Video Viral on social media

Trending Videos2022: बॉलिवूडमधील 'काला चष्मा' या गाण्याने जगभरातील लोकांना वेड लावलं आहे. काही दिवसांपूर्वी आपण सोशल मीडियावर आफ्रिकन लहान मुलं या गाण्यावर थिरकताना दिसले होत. त्यांचा या परफॉर्मन्सने अनेकांची मनं जिंकली होती. या गाण्यावर अनेक जण जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर रोज 'काला चष्मा' या गाण्यावरील एक ना एक व्हिडीओ दिसतो. जणू की सोशल मीडियावर 'काला चष्मा' हा ट्रेंडचं सुरु झाला आहे असं वाटतं. 

सध्या सोशल मीडियावर अजून एक व्हिडीओ दिसून येतो आहे. 'काला चष्मा' या गाण्याची जादू मुंबईच्या लोकल ट्रेनमध्येही दिसू आली. मुंबईकरप्रमाणेच 'काला चष्मा' या गाण्यावर यांनी हटके डान्स केला आहे. जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लोकल ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी आहे आणि समोर उभा असलेला एक मुलगा त्याला खाली ढकलतो आणि तो पडताच 'काला चष्मा' ची धून वाजू लागते, ज्यावर लोकलमधील हे तरुण अनोख्या पद्धतीने नाचू लागतात. (kala chashma trend at mumbai local train Video Viral on social media)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Randomly Khushaal (@randomlykhushaal)

हा मजेशीर व्हिडिओ randomlykhushaal या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, आतापर्यंत 13 लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत, तर 45 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीजण म्हणतात की ते खूप मजेदार आहे आणि काही म्हणतात की ते 'सर्वोत्तम'आहे. तर सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे हे नक्की.