Maharashtra Politics : शिवसेना आणि भाजपात (Shivsena vs BJP) जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून अनेकवेळा भाजपाचा उल्लेख कमळाबाई असा केला जातो. यावरुनच आता भाजापचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) गंभीर इशारा दिलाय. भाजपचा उल्लेख कमळाबाई केल्याने शेलारांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय. तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला पेंग्विन सेना (penguin) म्हणू का असा सवाल शेलार यांनी केलाय. तसंच अस्सल मुंबईकर कठोर शब्द आम्हालाही येतात असं शेलार यांनी सुनावलं आहे. आशिष शेलारांनी पत्र लिहून हा इशारा दिलाय.
कृपया,हे लक्षात असू द्या!@OfficeofUT pic.twitter.com/w1DFqYbU6q
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 3, 2022
आशिष शेलार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हे पत्र पोस्ट केलं असून यात त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना टॅग केलं आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आशिष शेलार यांनी शिवसेनेविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.
शिवसेनेचं शेलारांना उत्तर
आशिष शेलारांनी दिलेल्या या इशाऱ्याला आता शिवसेनेनंही उत्तर दिलं आहे. भाजपचेच अनेक नेते आणची कमळी जोरात आहे, असं वक्तव्य करतात, त्यांच्यावर आशिष शेलार यांनी का आक्षेप घेतला नाही, असं उत्तर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिलंय. पेंग्विन हा कुटुंबवत्सल पक्षी आहे, आमचाही कुटुंबवत्सल पक्ष आहे, असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.