मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलात जम्बो टँकर

मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात १४ हजार लिटर क्षमतेचे ११ जम्बो टँकर दाखल झाले आहेत. या नव्या ११ जम्बो टँकरचा लोकापर्ण सोहळा पालिका मुख्यलयासमोर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते पार पडला. 

Updated: Nov 6, 2017, 03:34 PM IST
मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलात जम्बो टँकर title=

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात १४ हजार लिटर क्षमतेचे ११ जम्बो टँकर दाखल झाले आहेत. या नव्या ११ जम्बो टँकरचा लोकापर्ण सोहळा पालिका मुख्यलयासमोर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते पार पडला. 

या जम्बो टँकरच्या समावेशामुळे अग्निशमन दलाची कार्यक्षमता वाढायला मदत होणार आहे. या टँकरमध्ये उच्च दाबाचा फायर पंप बसवण्यात आला आहे. तसंच दोन हाय प्रेशर होझ रिल आणि वॉटर मॉनिटरही बसवण्यात आलंय. 

अग्निशमन दलात सर्वाधिक म्हणजे १४ हजार लिटर पाणी क्षमता असणारा हा सर्वात मोठा टँकर आहे. मोठ्या आगीवेळी या टँकरचा मोलाचा उपयोग होणार आहे.