मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. पत्राचाळ घोटाळा प्रकारणी त्यांच्यावर आरोप आहेत. राऊतांच्या अटकेनंतर राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या अटकेवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी देखील यावर ट्विट केलं आहे. (Jaya bachchan on sanjay raut)
जया बच्चन यांनी २०२४ पर्यंत हे असंच चालणार असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या अटकेसाठी भाजप जबाबदार असल्याचंही जया बच्चन यांनी म्हटलंय.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई केली. ईडीने रविवारी सकाळीच राऊत यांच्या घरावर छापा टाकला. दुपारपर्यंत ही चौकशी सुरु होती. त्यानंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आणि ईडी कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आलं. त्यानंतर रात्री 12.30 च्या दरम्यान त्यांना ईडीने अटक केली.
संजय राऊत यांच्या घरातून ईडीने जवळपास 11 लाख रुपये देखील जप्त केल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर विरोधक भाजपवर टीका करत आहेत.