जैन इंटरनेशनल ऑर्गनायझेशनचा शपथविधी समारंभ

2001 साली नरेंद्र मोदी यांनी जैन इंटरनेशनल ऑर्गनायझेशन उद्घाटन केले होते, त्या जिओची व्याप्ती आता जगभर झाली आहे. 

Updated: Oct 8, 2017, 08:32 PM IST
जैन इंटरनेशनल ऑर्गनायझेशनचा शपथविधी समारंभ title=

मुंबई : 2001 साली नरेंद्र मोदी यांनी जैन इंटरनेशनल ऑर्गनायझेशन उद्घाटन केले होते, त्या जिओची व्याप्ती आता जगभर झाली आहे. 

या संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर त्यांचा शपथविधी समारंभ पार पडला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन कार्यकारिणी सदस्यांना शपथ दिली. 

तर जिओ वर्ल्ड मॅगझीनचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. सेवा, शिक्षण, आर्थिक उत्कर्ष, सामाजिक बांधिलकी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी जिओ काम करते. 

याच कार्यक्रमात...

सर्वोच्य जैन साध्वी भारतगौरव गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माता यांचा ६६ वा त्याग दिवस आणि ८४ व्या जन्मजयंती महोत्सवानिमित्त मुंबईतल्या गोरेगावमधल्या नेस्को संकुलात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. 

सर्वोच्य जैन साध्वी ज्ञानमती माताजी यांनी ४०० ग्रंथांचं लिखाण केलं आहे. तसंच देशातील विश्वविद्यालयातून माताजींना दोन वेळा 'डी लीट' पदवीने सन्मानित करण्यात आलं आहे. 

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , आमदार राज पुरोहित, मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते . भारत हा देश व्यसन व्यक्त झाला पाहिजे असे ज्ञानमती माता यांच्या कडून सांगण्यात आले.