Uday Samant Blood Pressure: शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासंदर्भात महत्वाची अपडेट समोर येतेय. उदय सामंत यांना तात्काळ मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उदय सामंत यांना अचानक उच्च रक्त दाबाचा त्रास जाणवू लागला. यानंतर त्यांना तात्काळ मुंबईतील लिलावती हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. येथे त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
समोर आलेल्या माहितीनुसार सध्या उदय सामंत यांची प्रकृती स्थिर असून ते लवकरच बरे होतील असे डॅाक्टरांनी सांगितले आहे.