विधान परिषद निवडणुकीत चुरस, 10 जागांसाठी 13 उमेदवार रिंगणात

भाजपने या निवडणुकीत पाच उमेदवार दिले आहेत त्यामुळे या निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

Updated: Jun 9, 2022, 05:00 PM IST
विधान परिषद निवडणुकीत चुरस, 10 जागांसाठी 13 उमेदवार रिंगणात title=

मुंबई : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 10 जागांसाठी येत 20 जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याची मुदत 13 जून आहे. या निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण 13 अर्ज दाखल झाले आहेत. भाजपने या निवडणुकीत पाच उमेदवार दिले आहेत त्यामुळे या निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

भाजपकडे हक्काची 113 मते आहेत. त्यामुळे 27 मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीला समर्थन असलेल्या 22 मतांची बेगमी करावी लागणार आहे. तर, काँग्रेसची 44 मते असून 27 मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या उमेदवाराला 10 मतांची गरज भासणार आहे.

विधानपरिषद निवडणुकीत भाजपने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( PRAVIN DAREKAR ), प्रसाद लाड ( PRASAD LAD ) यांना पुन्हा संधी दिली आहे. तर माजी मंत्री राम शिंदे ( RAM SHINDE ), महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे ( UMA KHAPRAE ), भाजप प्रवक्ते श्रीकांत भारतीय ( SHRKANT BHARTIY ) असे एकूण पाच उमेदवार दिले आहेत.

याशिवाय भाजपचे सहयोगी पक्ष आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख, माजी मंत्री सदाभाऊ खोत ( SADABHAU KHOT ) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना भाजपने जाहीर समर्थन दिले आहे. त्यामुळे भाजपचे पाच आणि सहयोगी पक्षाचे एक असे सहा उमेदवार रिंगणात आहेत.

भाजपचा कट्टर विरोधक शिवसेनेने माजी राज्यमंत्री सचिन अहिर ( SACHIN AHIR ) आणि उद्धव ठाकरे ( UDDHAV THACKAREY ) यांचे कट्टर समर्थक आमशा पाडवी ( AMSHA PADVI ) याना उमेदवारी दिली आहे. तर,  काॅंग्रेसकडून मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप ( BHAI JAGTAP ) आणि चंद्रकांत हंडोरे ( CHANDRAKANT HANDORE ) यांना विधान परिषदेच्या रिंगणात उतरवले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर ( RAMRAJE NAIK NIMBALKAR ) यांनाच पुन्हा संधी दिली आहे. तर, त्यांच्या जोडीला अनुभवी असे एकनाथ खडसे ( EKNATH KHADSE ) विधान परिषदेत पाठविण्यात आले आहे. सोबतच 'सेफ साईड' म्हणून शिवाजीराव गर्जे ( SHIVAJIRAO GARJE ) यांचाही उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे.