राज ठाकरे यांच्या कार्यक्रमातील स्टेज कोसळला; मोठ्या प्रमाणात गर्दीमुळे अपघात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोरेगाव शाखेचं उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. परंतू या स्टेजवर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली. त्यामुळे स्टेज कोसळला.

Updated: Feb 19, 2022, 01:40 PM IST
राज ठाकरे यांच्या कार्यक्रमातील स्टेज कोसळला; मोठ्या प्रमाणात गर्दीमुळे अपघात title=

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोरेगाव शाखेचं उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. परंतू या स्टेजवर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली. त्यामुळे स्टेज कोसळला.

राज ठाकरे गोरेगाव येथील शाखेच्या उद्घाटनासाठी एका कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यकर्त्यांची स्टेजवर मोठी गर्दी होती. दरम्यान कार्यकर्ते त्यांना पुष्पगुच्छ देण्यास पुढे सरसावले. त्यानंतर स्टेज कोसळला.

या अपघातात राज मात्र सुखरुप आहेत.  इतर कार्यकर्त्यांनाही कोणतीही इजा झालेली नाही. नंतर राज यांनी स्टेजवरून खाली उतरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.