मुंबई पोलीस कोरोनाच्या विळख्यात, इतक्या जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

 दुसऱ्या लाटेचा प्रभाव पोलीस दलावरही दिसू लागलाय

Updated: Apr 20, 2021, 08:08 AM IST
मुंबई पोलीस कोरोनाच्या विळख्यात, इतक्या जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह  title=

मुंबई : मुंबईसह (Mumbai Corona Cases) राज्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध आणि संचारबंदी लागू करण्यात आली. कोरोना वॉरीअर्स असलेलं पोलीस दल (Mumbai Police) रस्त्यावर उभे राहून आपली सेवा देतंय. पण पोलीस देखील कोरोनाच्या विळख्यात सापडलेयत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव पोलीस दलावरही दिसू लागलाय. गेल्या 24 तासांत 35 पोलिसांना कोरोना (Mumbai Police Corona Positive) झालाय. 

मुंबई पोलीस दलातील 35 अधिकारी, अंमलदार यांना कोरोना झालाय. गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील 8 हजार 655 अधिकारी, अंमलदार बाधित झाले आहेत. त्यापैकी 102 जणांचा मृत्यू झाला. कोरोना संसर्ग झालेल्यांपैकी 7 हजार 951 पोलिसांनी कोरोनावर मात केली. दरम्यान 7 हजार 551 पोलीस कर्तव्यावर परतले. सध्या 602 पोलीस बाधित आहेत.

कारवाई सुरु

दरम्यान कोरोनाचे नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई सुरुच आहे. नियमभंगाबाबत 456 गुन्हे नोंदवले. त्यात 243 जणांना अटक करून जामिनावर मुक्त करण्यात आले. सहा जणांचा शोध सुरू असून 207 जणांना नोटीस जारी करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी 126 वाहने जप्त केली आहेत.

लसीकरण केंद्र बंद 

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. क्वारंटाईन असलेल्यांची संख्या देखील वाढतेय. पण तुलनेत लसीकरणाचं प्रमाण कमी झालेलं दिसतंय. मुंबईत लसीकरण केंद्राची संख्या वाढवण्यात आलीय. या केंद्रावर लोकांच्या रांगा देखील पाहायला मिळतायत. पण याठिकाणी लसटंचाई जाणवू लागलीय. लसीकरणाच्या वेगावर याचा परिणाम होतोय. रविवारी तब्बल 35 खासगी केंद्रांनी लस साठ्याअभावी लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली. त्यामुळे दिवसभरात अर्ध्या संख्येने म्हणजेच 27 हजार 189 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

आज राज्यात 58,924 नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात आज 351 करोना बाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5% एवढा आहे. शनिवार, रविवारच्या लॉकडाऊननंतर सोमवारी आतापर्यंतच्या तुलनेत 10 हजार कोरोनाबाझाल्याधित कमीची नोंद आहे. म्हणजे लॉकडाऊनमुळे कोरोनाचा आकडा कमी होत आहे का? असा प्रश्न सामान्यांना पडत आहे. 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,40,75,811 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 3 (16.19टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 37,43,968 व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत.  तर 27,081 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.