'गुप्तेश्वर पांडेंच्या निवडणूक प्रचाराला देवेंद्र फडणवीस जाणार का ?'

बिहार निवडणुकीत भाजपचे प्रभारी म्हणून फडणवीस काम पाहणार आहेत

Updated: Oct 6, 2020, 01:11 PM IST
'गुप्तेश्वर पांडेंच्या निवडणूक प्रचाराला देवेंद्र फडणवीस जाणार का ?' title=

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार करणार का ? असा प्रश्न गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारलाय. बिहारचे पोलीस प्रमुख जे होते ते आता निवडणूक लढवत आहे, फडणवीस हे बिहार निवडणूक प्रभारी आहेत. ते या अधिकाऱ्याच्या निवडणूक प्रचाराला जाणार का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणी तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर गुप्तेश्वर पांडे यांनी प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर हा वाद उफाळून आला. दरम्यान पोलिसांना बदनाम करण्याचे प्रयत्न ज्यांनी केले त्यांनी राज्याची माफी मागितला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही असे देशमुख यावेळी म्हणाले. 

AIMS आणि मुंबई स्थानिक  रुग्णालयाचे रिपोर्ट बघितले तर त्यामध्ये वेगळं काही आढळलं नाही. सीबीआय तपास सुरू आहे, त्यांनी लवकरात लवकर रिपोर्ट जाहीर केला तर सुशांत सिंह प्रकरणमधील तथ्य बाहेर येईल असेही ते म्हणाले.

मिशिगन विद्यापीठ, अमेरिका यांनी एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे की सुशांत सिंह प्रकरण हे हाईप करण्यात आले आहे असं त्यात म्हंटलं आहे. राजकीय पक्ष, काही प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण हाईप केलं आहे

यानिमिताने महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं काम भाजपने केलं. मुंबई पोलिसांनी सुद्धा तपास योग्य केला आहे असं SC ने म्हंटलं आहे. महाराष्ट्र पोलिसांचे ५ वर्ष नेतृत्व करणाऱ्या फडणवीस यांनीही मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने नव्हता असं म्हंटलं असल्याचा उल्लेखही देशमुख यांनी यावेळी केला.