मुंबई : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या नाईट लाईफबाबत महत्वाचा निर्णय घेतला होता. 26 जानेवारीपासून मुंबईच्या नाईट लाईफला सुरूवात होणार होती. मात्र आता गृहमंत्र्यांकडून हे स्वप्न लांबणीवर जाताना दिसत आहे. यामुळे पर्यटन मंत्र्यांनी घेतलेला पहिलाच निर्णय लांबणीवर जाणार का? याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'नाईट लाईफ' बाबतचा निर्णय 26 जानेवारीपर्यंत घेता येणार नाही.' पोलीस यंत्रणेवर किती ताण पडू शकतो याची पूर्ण माहिती घेऊनच राज्य शासन निर्णय घेईल. तसेच यंत्रणा पुरेशी आहे की नाही हे बघून निर्णय घेतला जाणार आहे.' (नाईट लाईफ: पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचा पहिला मोठा निर्णय)
तसेच मुंबईत आंतरराष्ट्रीय पर्यटक येतात. त्यामुळे हा चांगला निर्णय असल्याचं अनिल देशमुख म्हणाले आहेत. मात्र 26 जानेवारी पासून नाईट लाईफ सुरू होईल असं वाटत नाही. त्यामुळे याचा निर्णय येत्या बुधवारी कॅबिनेट आहे त्यात घेतला जाईल असं सांगण्यात आलं आहे.
आदित्य ठाकरेंच्या या निर्णयाचं आमदार रोहित पवार यांनी देखील कौतुक केलं होतं. नाईट लाईफमध्ये मुंबईतली रेस्टॉरंटस, मॉल्स, मल्टिप्लेक्सेस सुरू राहणार आहेत. मुंबईकरांना रात्रभर शॉपिंग करता येणार आहे. सिनेमा पाहता येणार आहे. रात्री रेस्टॉरंटमध्ये खाता-पिता येणार आहे. आदित्य ठाकरेंचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पर्यटन मंत्री होताच त्यांनी हा पहिला निर्णय घेतला आहेफेसबुक पोस्ट लिहून महाविकासआघाडीचं आणि आदित्य ठाकरेंच कौतुक केलं होतं. आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या या निर्णयाचं सगळ्याच स्तरावरून कौतुक होताना पाहायला मिळत होतं. तरूणाईमध्ये याचा उत्साह पाहायला मिळत आहे.