मुंबईत 236 की 227 प्रभाग? तत्कालीन ठाकरे सरकारच्या निर्णयावर 20 डिसेंबर रोजी सुनावणी

Mumbai BMC Election: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत 236 प्रभाग असावेत अशी याचिका दाखल केली होती, त्याबाबत आता पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे

Updated: Nov 30, 2022, 04:31 PM IST
मुंबईत 236 की 227  प्रभाग? तत्कालीन ठाकरे सरकारच्या निर्णयावर 20 डिसेंबर रोजी सुनावणी title=

Mumbai BMC Election: आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी (BMC Election) ठाकरे सरकारने वाढवलेली मुंबईतील प्रभागसंख्या 236 वरून पुन्हा 227 करण्याच्या निर्णयावर मुंबई हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत 236 प्रभाग असावेत अशी याचिका दाखल केली होती. मात्र शिंदे सरकारने ही प्रभाग रचना 236 वरून पुन्हा 227 करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली होती. त ही याचिका न्यायालयासह सरकारी यंत्रणांच्या वेळेचा अपव्यय करणारी असल्याचा दावा राज्य सरकारने उच्च न्यायालयात करत ती फेटाळण्याची मागणी केली होती. याबाबत आज न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 20 डिसेंबर रोजी होणार आहे.

न्यायाधीश गंगापूरवाला आणि न्यायाधीश जेजे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी पार पडली आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी आता 20 डिसेंबर रोजी घेणार असल्याचे सांगितले. तसेच हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याची बाब गेल्या सुनावणीत राज्य सरकारने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे न्यायालायने 14 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीनंतर निर्णय देणार असल्याचे म्हटले आहे.