मुंबई : एचडीएफसी (HDFC) बँकेतील मराठी माणसाच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सरसावली आहे. मनसे नेत्यांच्या नेतृत्वाखाली एचडीएफसी बँकेच्या लोअर परळ येथील मुख्य कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्ठमंडळाने धडक दिली.
मुंबईसह महाराष्ट्रातील कामगार संघटनेतील सभासद मराठी कामगारांना जर बेकायदेशीर पद्धतीने कामावरून काढले तर महाराष्ट्रभर आंदोलन उभे करू असा सज्जड दम एचडीएफसी बॅंकेचे व्यवस्थापक .हेमंत नाईक यांच्या उपस्थितीत मनसेच्या वतीने देण्यात आला.
या प्रसंगी कामगार सेनेतील पदाधिकारी व वरळी विधानसभेतील पदाधिकारी मनसैनिक आज मनकासे अध्यक्ष मनोज चव्हाण, वरळी विधानसभा विभागअध्यक्ष संतोष धुरी,मनकासे उपाध्यक्ष सचिन यशवंत गोळे,मनसे उपाध्यक्ष संजय जामदर,लॉटरी सेना अध्यक्ष बंटी म्हशिलकर तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.