मुंबई : धर्मा पाटील या शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी राज्य सरकारची उदासीनता पुन्हा एकदा समोर आलीय.
आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आत्महत्या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात दिले होते. मात्र, एक आठवडा उलटला तरी याबाबत सरकारची टोलवाटोलवी सुरू आहे.
अहवाल आला की नाही? याबाबत सरकार ठोस उत्तर देत नाहीय. सरकारनं या घटनेची गंभीर दखल घेऊन, कृती आराखडा तयार करण्याचं काम सुरू केलंय, अशी माहिती मंत्रीमंडळाचे प्रवक्ते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
तर आजच्या बैठकीत अनेक विषय असल्यानं धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणावर चर्चाच झाली नाही, असं शिवसेनेचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितलं.