मुंबई : 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईत अतिरेकी हल्ला झाला होत्या त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त मुंबईत तैनात आहे. सामान्य मुंबईकर आणि मोर्चेकऱ्यांना त्रास होऊ नये तसंच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून पोलीस काळजी घेत आहेत. मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या सूत्रधारांच्या अटकेसाठी मदत होईल अशी माहिती देणाऱ्यास अमेरिकेने 50 लाख डॉलर्सचं बक्षिस जाहीर केलंय.
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने आज या बक्षिसाची घोषणा केली. लष्कर ए तोयबाने घडवून आणलेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात तब्बल १६६ जणांचा बळी गेला होता.
त्यात सहा अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे.
अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांची काही दिवसांपूर्वी सिंगापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली होती.
त्यावेळी घटनेला 10 वर्षे उलटूनही या हल्ल्याच्या सूत्रधारांवर काहीच कारवाई न झाल्याबद्दल खुद्द पेन्स यांनी चिंता व्यक्त केली होती.
ज्यांना कोणाला याबाबत काही महत्त्वपूर्ण माहिती द्यायची असेल त्यांनी info@ rewardsforjustice.net या इमेल आयडीवर किंवा 8008773927 या क्रमांकावर संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलंय.