26/11 : रेल्वे अनाऊन्सरला आजही जाणवतं दहशतवादी कसाबचं हसणं

तो अनुभव अतिशय भयंकर 

26/11 : रेल्वे अनाऊन्सरला आजही जाणवतं दहशतवादी कसाबचं हसणं  title=

मुंबई : आज मुंबईवरील 26/11 या दहशतवादी हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाली. दहशतवादी अजमल कसाबला मुंबई पोलिसांनी जिवंत पकडलं होतं. अजमल कसाबचं ते घाणेरडं हसणं आजही विष्णू झेंडे यांच्या कानात जाणवतं. आजच्याच दिवशी 10 वर्षापूर्वी रात्री छत्रपति शिवाजी टर्मिनसवर उपस्थित असलेले रेल्वे अनाऊन्सर झेंडे यांनी आपल्या सतर्कतेमुळे अनेकांचा जीव वाचवला. 

विष्णू झेंडे यांनी त्या रात्रीला आठवत सांगितले, मला कसाबचं ते घाणेरडं हसणं आजही आठवतं. रायफलसोबत तो उपनगरीय प्लॅटफॉर्मकडे जात होता. प्लॅटफॉर्मवर चेहऱ्यावर एक असूरी आनंद ठेवत तो रायफलमधून गोळ्या झाडत होता. 

झेंडे आता मध्ये रेल्वेचे गार्ड आहेत. त्यांनी सांगितलं की, त्या दहशतवादी हल्ल्याला आणि तो ज्या क्रूरतेने माणसांना मारत चाललेला त्याला विसरणं आजही कठीण आहे. या प्रसंगाला आज 10 वर्षे झाली पण आजही ते डोळ्यासमोर स्पष्ट आहे. 

26/11 हमला: पेट्रोल पंप आवंटन में किया गया भेदभाव- पीड़ित की विधवा

झेंडे यांनी कसाब आणि एका दहशतवाद्याला प्लॅटफॉर्मकडे येताना पाहूनच ओळखलं की हे दहशतवादी आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं की, मला प्रवाशांना दहशतवादी हल्ल्याबद्दल सतर्क करायचं होतं. मी घोषणा करून प्रवाशांना तात्काळ रेल्वे स्टेशन खाली करण्यास सांगितलं. 

झेंडे यांनी प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून बाहेर जाण्याचा सल्ला दिला. कारण त्यांना वाटलं त्यावेळी तेच योग्य आहे. मुंबईतील 26/11 ला एकूण 166 लोकं मारले गेले. त्यामधील 52 लोकांचा मृत्यू हा रेल्वे प्लॅटफॉर्मवर झाला. तर 108 लोकं या स्टेशनवर जखमी झाले.