फोर्ब्स मासिकाकडून 'संगीत देवबाभळी'चे कौतुक

या संगीत एकांकिकेने सुरुवातीला एका स्पर्धेच्या माध्यमातून रंगमंचावर पाऊल ठेवले.

Updated: Aug 27, 2018, 09:12 PM IST
फोर्ब्स मासिकाकडून 'संगीत देवबाभळी'चे कौतुक title=

मुंबई: प्रसाद कांबळीची निर्मिती असलेले आणि प्राजक्त देशमुख दिग्दर्शित 'संगीत देवबाभळी' या नाटकाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जगप्रसिध्द 'फोर्ब्स' मासिकाने या नाटकाची दखल घेतली. भारतामधील सर्वाधिक लोकप्रिय नाटकांच्या यादीत फोर्ब्सने 'संगीत देवबाभळी'चा समावेश केला आहे. 

याशिवाय, 'अमर फोटो स्टुडिओ', 'वाडा चिरेबंदी', 'इंदिरा', 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकांचेही फोर्ब्सने कौतुक केले. 

संगीत देवबाभळी या संगीत एकांकिकेने सुरुवातीला एका स्पर्धेच्या माध्यमातून रंगमंचावर पाऊल ठेवले. स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर या नाटकाने काही महिन्यांपूर्वी व्यावसायिक रंगभूमीवरही पदार्पण केले. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत या नाटकाने १२५ प्रयोगांचा टप्पा पूर्ण केला.