मुंबई : राज्यात नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झाली आहे. शिवसेना (Shiv Sena) राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसच्या समन्वय समितीची पहिली बैठक सुरु झाली आहे. किमान समान कार्यक्रम ठरविण्यावर भर देण्यात येत आहे. सत्तेतील सहभाग यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या (Congress) महाशिवआघाडीची पहिली संयुक्त बैठक वांद्र्याच्या एमईटीमध्ये सुरु झाली असून या बैठकीला शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई उपस्थित आहेत.
काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक उपस्थित आहेत. तीन्ही पक्षांची समन्वय समितीची ही पहिली बैठक आहे. त्यामुळे राज्यात शिवआघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे.