गोरेगावच्या कामा इस्टेट परिसरात भीषण आग

गोरेगाव पूर्व भागातील कामा इस्टेट परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडलीय. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 27, 2018, 12:35 PM IST
गोरेगावच्या कामा इस्टेट परिसरात भीषण आग title=

मुंबई : मुंबईत गोरेगाव पूर्व इथल्या कामा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये असलेल्या गाळ्यांना सकाळी ८.०० वाजल्याच्या दरम्यान भीषण आग लागली.

या आगीत १० ते १५ गाळ्याचे मोठे नुकसान झालंय. या आगीत गाळ्यातील सामान, मोल्डिंग मशीन्स, कच्चा माल, पूर्णपणे जळून खाक झालाय.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. 

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून एका तासात आगीवर नियंत्रण मिळवलं. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग लागलेल्या गाळ्यांच्या कूलिंगचं काम सुरु आहे.

रस्त्याजवळील ट्रॉन्सपोर्ट लॉजिस्टिक गाळ्याला पहिली आग लागली. त्यानंतर काही वेळात बाजूला असलेल्या गाळ्याना आग पसरली. मात्र आगीचे कारण स्पष्ट झालं नाही.