जगातील कोणत्याच बाप-लेकीसोबत असं घडू नये

बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू  

Updated: Feb 3, 2020, 01:34 PM IST
जगातील कोणत्याच बाप-लेकीसोबत असं घडू नये title=

मुंबई : वडील आणि मुलीचं नातं हे जगातील सर्वच नात्यांपेक्षा वेगळं आहे. पण जगातील कोणत्याच बाप-लेकीसोबत घडू नये अशी घटना कल्याणमध्ये राहणाऱ्या बाप-लेकीसोबत घडली आहे. शनिवारी रात्री चालत्या लोकलमध्ये चिमुकल्या मुलीला लघुशंका आली होती. तेव्हा रेल्वे सिग्नल लागल्याचं पाहून वडिलांनी मुलीला खाली उतरवले पण याच दरम्यान समोरून येणाऱ्या लोकलने बाप-लेकीला उडवले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

लोकल रेल्वेच्या धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. अर्शद खान असं ४० वर्षीय वडिलांचे नाव आहे तर मुलीचं नाव आयशा खान असं आहे. कल्याण-ठाकुर्ली दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. 

मुलीला लघुशंका आली होती. म्हणून कल्याण-ठाकुर्ली दरम्यान रेल्वेला सिग्नल लागल्यामुळे वडील आणि मुलगी रेल्वेमधून खाली उतरले. तेवढ्यात सीएसएमटी कडे जाणाऱ्या भरधाव रेल्वेच्या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. 

आर्शद खान हे कल्याण पश्चिमेकडील गोविंदवाडी परिसरात राहतात. आयशाला शाळेकडून रिझर्व्ह बँकेसंबंधीत प्रकल्प दिला होता. त्यामुळे तिने आपल्याला रिझर्व्ह बँकेचा फोटो हवा आहे असा हट्ट वडिलांकडे केला. मुलीच्या हट्टापायी संपूर्ण खान कुटुंब मुंबईत रिझर्व्ह बँकेचा फोटो टिपण्यासाठी आले होते. 

फोटो काढल्यानंतर खान कुटुंब परतीच्या प्रवसाला निघाले. शनिवारी रात्री कल्याणच्या दिशेने येत असताना रात्री ९.३०च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. कल्याणमध्ये दाखल होण्यासाठी अवघे काही मिनिटं बाकी असताना या बाप-लेकीवर काळाने घात केला.  

आताच्या आणखी काही सर्वात महत्त्वाच्या बातम्या

आसाममध्ये नदीला आग, तीन दिवसांपासून धगधगतेय

...आता पॅन कार्ड काढणं अधिक सोप्पं

जगातील कोणत्याच बाप-लेकीसोबत असं घडू नये

'महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग'

दिग्दर्शकाच्या मदतीसाठी पुढे सरसावला खिलाडी कुमार