मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; २ ठार २ जखमी

गेल्या काही काळात रस्तेअपघातांची संख्या मोठ्या प्रामाणावर वाढली आहे.

Updated: Jul 2, 2018, 10:46 AM IST
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; २ ठार २ जखमी title=

मुंबई: मुंबई गोवा महामार्गावर दाभिळ नाका इथं झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. मालवाहू टँकर आणि कारमध्ये हा अपघात झाला. या अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. गेल्या काही काळात रस्तेअपघातांची संख्या मोठ्या प्रामाणावर वाढली आहे. त्यामुळे रस्ताप्रवास सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

युनिट डायरेक्टरचा मृत्यू

प्राप्त माहितीनुसार, लोटे औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीतील कार्यक्रम उरकून कंपनीतील चौघे जण मोटार कारने मुंबईच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावर दाभिळ नाक्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात घडला. या अपघातामध्ये कंपनीचे लोटे युनिटचे डायरेकटर आणि फॅक्ट्री मॅनेजर गिरीष बर्वे हे जागीच ठार झाले तर गंभीर जखमी झालेले कंपनीचे पर्सनल मॅनेजर विशाल म्हातले यांच्यावर चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मळवली. 

जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू

दरम्यान, अपघातात जखमी असलेल्या राकेश वडाळकर यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून, राजेश जोशी हेही या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. हा अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.