जोगेश्वरी रेल्वेस्टेशनवर आता जलद गाड्या थांबणार नाहीत...

जोगेश्वरी रेल्वेस्टेशनमध्ये गोरेगाव आणि मालाडवरुन सुटणा-या जलद गाड्या थांबणार नसल्याची घोषणा मंगळावारी जोगेश्वरी स्थानकामध्ये केली जात होती.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 4, 2017, 08:16 PM IST
जोगेश्वरी रेल्वेस्टेशनवर आता जलद गाड्या थांबणार नाहीत...  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : जोगेश्वरी रेल्वेस्टेशनमध्ये गोरेगाव आणि मालाडवरुन सुटणा-या जलद गाड्या थांबणार नसल्याची घोषणा मंगळावारी जोगेश्वरी स्थानकामध्ये केली जात होती. त्यामुळे नागरिकांच्या संभाव्य उद्रेकाला तोंड देण्यासाठी रेल्वेनं प्रचंड फौजफाटा तैनात ठेवला होता.

जोगेश्वरीतील नागरिकांनी एकत्र येऊन या रेल्वेच्या निर्णयाचा विरोध केला. मात्र, प्रवाशांची आंदोलनाची तयारी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं प्रवाशांच्या आंदोलनाआधीच फास्ट ट्रेनचे सहापैकी तीन थांबे सकाळी 08.06, 09.05 आणि 09.59 पुन्हा सुरु केले. मात्र, सहाचे सहा थांबे पूर्ववत करा आणि आणखी थांबे वाढवा असा जोर प्रवाशांनी लावून धरलाय. त्यानुसार लवकरच रेल्वे प्रशासन आणि प्रवाशी यांच्यात बैठकीत निर्णय घेतला जाईल असं प्रवाशांना कळवण्यात आलं आहे.