चीनमधल्या बुद्ध स्मारकाची उंची वाढल्यानंतर... शिवस्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णय

जगातील सर्वाधिक उंचीचं स्मारक ठरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय

Updated: May 2, 2018, 08:56 PM IST
चीनमधल्या बुद्ध स्मारकाची उंची वाढल्यानंतर... शिवस्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णय title=

मुंबई : मुंबईच्या अरबी समुद्रात प्रस्तावित असणाऱ्या शिवस्मारकाची उंची दोन मीटरनं वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. जगातील सर्वाधिक उंचीचं स्मारक ठरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. यापूर्वी शिवस्मारकाची उंची २१० मीटर असणार होती. मात्र, चीनमधील स्प्रिंग बुद्ध मंदिराची उंची २०८ मीटरवरून २१० मीटर प्रस्तावित करण्याचा निर्णय नुकताच चीन सरकारनं घेतला. त्यामुळं शिवस्मारकाची उंची २१० मीटरवरून २१२ मीटर करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. यामुळे शिवस्मारक जगातील सर्वात उंच स्मारक म्हणून ओळखलं जाणार आहे.

हे स्मारक उभारण्यासाठी 'लार्सन अँड ट्युब्रो' या कंपनीला २५०० कोटींचं कंत्राट देण्याचा निर्णय मार्च महिन्यात घेण्यात आला होता.